कर्जमाफी योजनेला शिवरायांचे नाव देणे अयोग्य : उद्धव ठाकरे 

कर्जमाफी योजनेला शिवरायांचे नाव देणे अयोग्य : उद्धव ठाकरे 

रत्नागिरी : "जाहिरातींवर फालतू खर्च केला जात आहे आणि निधीअभावी जिल्हा परिषद कोमात जातेय, याला जबाबदार कोण, का निधी दिला जात नाही, निवडणुकीत भोपळा मिळाला म्हणून कोकणावर भाजपकडून सूड काढला जात आहे,'' असा आरोप करून येथील जनतेच्या मुळावर कोणी येणार असेल, तर सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. 

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, की हरामखोरांना आम्ही मोठे केले. जो कोणी माझ्या स्वराज्यावर चालून येईल, त्याचा खात्मा झालाच पाहिजे. कर्जमुक्‍ती योजना कोकणातील किती लोकांना मिळाली माहिती नाही. सगळेच्या सगळे शेतकरी कर्जमुक्‍त झाले पाहिजेत, हे स्वप्न आहे; पण ते होणार नसेल तर शिवरायांचे नाव कर्जमाफी योजनेला देणे योग्य नाही. आंबा हंगाम सुरू झाला असताना कीटकनाशकांवर बंदी घातली गेली. या आंब्याची चव जग चाखतेय. ते बागायतदारांचे कष्ट आहेत. त्याच आंब्यावर कीड लागली, तर बागायतदार काय करणार, तेव्हा तो पोस्टर लावत फिरणार का "व्हय मी लाभार्थी आहे'. 

"व्हॉट्‌सऍपवर सध्या एक संदेश फिरतोय की "अच्छे दिन तो आये हे, मगर दिल्ली मे प्रदूषण है, इसलिए दिखाई नही दे रहे है,' ही गोष्ट खरीच आहे. विकासाची वाट धुक्‍यात हरवली आहे. ती वाट नव्हे, विल्हेवाट आहे,'' अशा शब्दात ठाकरे यांनी पंतप्रधानांचीही खिल्ली उडविली. ""गुजरात निवडणुका जवळ आल्यानंतर "जीएसटी' कमी करण्याचा निर्णय झाला. सुदैवाने ते पुन्हा निवडून आले, तर त्यांचा सुशीलकुमार शिंदे होईल. शिंदे यांनी 1999 मध्ये असेच केले. शिवसेनेने शेतकऱ्यांना वीजबिलमुक्‍तीची हाक दिली. त्याची अंमलबजावणी करत शिंदे यांनी शेतकऱ्यांची बिले माफ केली. पुन्हा सत्ता आल्यानंतर वीजबिले वाढवून येऊ लागली. हीच स्थिती गुजरातच्या निवडणुकीनंतर होऊ शकते. गुजरातमध्ये पन्नास सभा पंतप्रधानांनी घेतल्या. त्यामुळे तिथे सत्ता येण्याची शक्‍यता आहे. तेथील जनता सुज्ञ आहे, ते नक्‍कीच विचार करून मतदान करतील. शिवसेना सत्तेत राहूनही जनतेसोबतच राहणार,'' अशी ग्वाही त्यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com