udhhav thackrey about pankaja mundes chief ministership | Sarkarnama

पंकजा मुंडेंना एका तासासाठी तरी मुख्यमंत्री करा: उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई: "ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एका तासासाठी तरी मुख्यमंत्री करा. मराठा आरक्षणाची रखडेल्या फाईलीवर त्या सही करतील', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखात ठोस भूमिका मांडली आहे. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुखमंत्री पहाटे तीन वाजेपर्यंत काम करतात, असा दावा केल्याचा संदर्भ देत या अग्रलेखात म्हटले आहे की, क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने मुख्यमंत्र्याची झोप उडाली आहे. पापणी मिटवली तर पंकजा ताई सही करतील, अशी भिती त्यांना आहे. 

पण, पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेवून सांगितले आहे की, माझ्या हातात मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणात हातावेगळी केली असती. त्यामुळं पंकजा मुंडे यांना एका तासासाठी तरी मुख्यमंत्री करा, असा प्रहारच उद्धव ठाकरे यांनी अग्रलेखातून केल्याची चर्चा आहे. 

संबंधित लेख