udhav thckray attack cm | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा, धनगर, लिंगायतांना राज्य सरकारनं काय दिले? :; उद्धव ठाकरे :

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई, : राज्यात सध्या सर्वत्रच अस्वस्थता असून आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा, धनगर व लिंगायत समाजाला सरकारने काय दिले, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांना सरकारच्या जाचक नियमामुळे येत असलेल्या अडचणीबाबत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात सध्या प्रचंड अस्वस्थता असून सरकार कोणत्याही वर्गाचे अथवा समाजाचे समाधान करू शकत नसल्याची भावना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हे सरकार देऊ शकत नाही

मराठा, धनगर व लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. एवढेच काय पण, हिंदूंच्या सणांसाठी सुरक्षित कायदे व नियम पण देऊ शकत नाही. हिंदूंच्या सणासाठी जो उठतो तो न्यायालयात जातो अन सरकार गप्प राहते, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्‍त केली. 

मंत्रिमंडळ टेंपररी असते पण कर्मचारी पर्मनंट असतो, असा टोला लगावताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. हिंदूंच्या उत्सवाच्या आड येऊ नका, असा इशारा देत प्रत्येक गोष्टीत न्यायालयाकडे बोट दाखवू नका. न्यायालयाने दिलेला ऍट्रॉसिटीचा निकाल बदललाच ना, मग हिंदूंच्या सण उत्सवासाठी का थांबलात, असा थेट सवाल ठाकरे यांनी केला.

आमचा उत्सव कसा साजरा करावा हे कायदेपंडितांनी सांगू नये, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. हिंदूंच्या सण व उत्सवाच्या आड कायदे येत असतील तर रस्त्यारस्त्यांवर महाआरती करू. गणपती उत्सवातल्या मंडपांचा त्रास होत असेल तर मेट्रोच्या कामाचा त्रास होत नाही काय, हिंदूंच्या सणांवर गंडांतर आणताना भान ठेवा, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित लेख