udhav thakrey`s today`s speech not impressive | Sarkarnama

उद्धव ठाकरेंचा काजवा शिवतीर्थापुरताच : भाजपची टीका

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यातील भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. अयोध्येला २५ नोव्हेंबरला जाण्याची घोषणा करून त्यांनी राममंदिराचा मुद्दा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आणण्याची व्यूहनीती आणली. त्यांच्या या भाषणावर भाजपने मात्र कडवट टीका केली आहे.

भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्ये ही शिवतीर्थावरील भाषणापुरती आहेत. त्यांना फार महत्त्व द्यायची गरज नाही, या शब्दांत प्रत्युत्तर दिले. महागाई, पेट्रोल दरवाढ अशा विषयांवर ठाकरे बोलले. त्यांना या विषयावर बोलयाचा काय अधिकार, असा प्रतिप्रश्न पाठक यांनी केला. शिवसेनेला आंतरराष्ट्रीय मुद्यांवर बोलण्याचे कारण काय, अशीही विचारणा त्यांनी केली.

शिवसेना गेली ४० वर्षे दसरा मेळावा घेत आहे. मात्र हा पक्ष ठाणे आणि मुंबईच्या पलीकडे जाऊ शकला नाही, असा टोमणाही पाठक यांनी टिव्हीवरील चर्चेत व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार असल्याचा मुद्दाही त्यांनी फार गंभीरतेने घेतला नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याचे पाठक यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते अशोक धात्रक यांनी तर उद्धव यांच्या भाषणाला एकही टाळी पडली नाही, असे निरीक्षण नोंदविले.   

संबंधित लेख