उद्धव ठाकरेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

उद्धव ठाकरेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

मुंबई : मुंबई महापालिकेत नेहमीच "करून दाखवले" असा सुर काढणाऱ्या शिवसेनेने आता नगरसेवकांच्या कामगिरीवरच थेट "नजर" ठेवायला सुरवात केली आहे. मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेना नगरसेवकांच्या कामाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. शिवसेनेच्या मुंबईचे आमदार व नगरसेवकांच्या कोअर कमिटी आज सेनाभवन येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत नगरसेवकांच्या कामाची ठाकरे यांनी चांगलीच "झाडाझडती" घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुंबईचा 2034 पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या मे महिन्यात हा आराखडा सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी काय भूमिका मांडली पाहिजे. यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईच्या काही निवडक नगरसेवक आणि आमदार यांची बैठक सेना भवन येथे घेतली. या बैठकीत आरे डेअरी येथे होणाऱ्या कारशेडबाबत सेनेची भूमिका, विकास आराखडा, पालिकेतील कामाचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीबाबत माहिती देताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, "मुंबईकर नागरिकांना आवश्‍यक असणार विकास आराखडा असला पाहिजे. लोकांना विकास आराखड्यात योग्य न्याय दिला पाहिजे. मुंबईकरांना आवश्‍यक आरक्षण विकास आराखड्यात मिळाली पाहिजेत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने सुद्धा मुंबईकरांना हवा तसा डीपी बनवला पाहिजे अशी मागणी करणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पारदर्शी कारभारावरून शिवसेनेला लक्ष करण्यात आले होते. शिवसेनेवर हप्ता घेत असल्याचा आरोप खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यामुळे युतीत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर भाजप तटस्थ राहिल्याने शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौरपदी विराजमान झाले. मुंबई महापालिकेच्या कारभारावरून शिवसेनेवर टीका होऊन नये यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नगरसेवकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. यासाठी कोअर कमिटीची नेमणूक करणात आली असून या कमिटीत आमदार सुनील प्रभू, नगरसेवक यशवंत जाधव, रमेश कोरगावकर, मंगेश सातमकर, राजुल पटेल, बाळा नर, आशीष चेंबूरकर, श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com