udhav thakray | Sarkarnama

शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांशी " गुफ्तगू"

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : कधी नव्हे ते मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी सामान्य जनतेची मोठी गर्दी उसळली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यानच मंत्री मंत्रालयात असतात, याची माहिती सामान्य लोकांनाही माहीत झाल्यामुळे आपली कामे घेऊन अनेकजण मंत्रालयात आले होते. 

बहुतांश मंत्र्यांच्या दालनातील अभ्यागत कक्ष तुडुंब भरला होता. त्यामुळे काही मंत्र्यांच्या दालनाबाहेर अक्षरश: रांगा लागल्या होत्या. विशेषत: चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, राम शिंदे, विष्णू सवरा, राजकुमार बडोले, दीपक केसरकर, जयकुमार रावल, संभाजी पाटील- निलंगेकर या मंत्र्याच्या दालनाबाहेर गर्दी उसळली होती. 

विशेष म्हणजे, बहुतांश मंत्र्यांनी मंत्रालयात फार वेळ घालविण्यापेक्षा आपल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मतदार संघ, तालुका व जिल्ह्यात काहीही करून भाजपची पाळेमुळे खोल रोवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाकडून सगळ्यांना सक्त सूचना आहेत. अशातच गेली दोन वर्षे सतत निवडणुकीच्या धामधुमीत गेली. त्यामुळे बहुतांश मंत्र्यांनी आपल्या खात्यापेक्षा मतदारसंघाला अधिक महत्त्व दिले आहे. 

कधी नव्हे ते मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांचा बहुतांश वेळ खितपत पडलेल्या फाईंलींवर स्वाक्षरी करणे, कळीचे विषय तातडीने मार्गी लावणे, अधिका-यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे, व्हीआयपींसोबत चर्चा करणे यांतच निघून जातो. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनाबाहेर तासनतास ताटकळत उभ्या राहिलेल्या सामान्य लोकांना न भेटताच काही मंत्री निघून जातात. तर काहीजण तर भेटण्यास आलेल्या लोकांकडून केवळ कागद घेऊन ते त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडे देण्याचे सोपस्कार पार पाडतात. 
मंत्री आठवड्यातून किमान तीन दिवस जरी मंत्रालयात उपस्थित राहिले तरी सामान्य लोकांना होणारा त्रास कमी होईल, असे बोलले जात आहे. 

संबंधित लेख