udhav thakray | Sarkarnama

तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा आजपासून

संजीव भागवत: सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रणरणत्या उन्हात राज्यातील अनेक जिल्हे, परिसर ढवळून काढणाऱ्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात मंगळवारपासून (ता.25 एप्रिल) होत आहे. या यात्रेतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पूर्ण वेळ सहभागी होणार असल्याने ही यात्रा सरकार विरोधात चांगलीच गाजणार आहे. 

तिसऱ्या टप्याच्या संघर्ष यात्रेची सुरुवात ही राजर्षि शाहू महाराजांच्या कोल्हापुर नगरीतून होणार आहे. कोल्हापुरहुन पुढे सांगली, सातारा मार्गे जाऊन 27 एप्रिल रोजी सांयकाळी सोलापुर येथे भव्य कार्यक्रमात या संघर्ष यात्रेचा समारोप होईल. कोल्हापुर, सांगली, सातारा हा पट्टा राष्ट्रवादीचा गड असल्याने या संघर्ष यात्रेदरम्यान शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत सहकारी संस्था, सहकारी बॅंका, विविध सामाजिक संस्था यांचे लाखो प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. तर याच पट्टयात होणाऱ्या प्रत्येक सभेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

कोल्हापुरहुन निघालेली ही यात्रा सांगली, सातारा येथे पोहचल्यास मोठ्या सभांचे आयोजन स्थानिक आयोजकांकड़ून केले जाणार आहे, राष्ट्रवादी कांग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांसोबतच कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर आदी जिह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या तिसऱ्या तप्प्यातील संघर्ष यात्रेत सहभागी होणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. 

संबंधित लेख