udhav thakare and state | Sarkarnama

पार्टी रिजनल असली तरी ओरिजनल - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई : आमचा पक्ष म्हणजे शिवसेना ही रिजनल असली तरी ओरिजनल आहे असे उद्‌गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. "सामना'मध्ये सुरू असलेल्या मॅरेथॉन मुलाखतीच्या दुसऱ्या भागात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली. सरकारमध्ये सामील होण्यापासून ते अगदी वेगळ्या विदर्भाबाबत तसेच राज ठाकरे, नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्याबद्दलही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज ठाकरे यांचा पक्ष आपण फोडलात का असे विचारले असता ते म्हणाले," मागे एकदा आम्हाला तुमची पार्टी रिजनल आहे असे विचारले होते, मी तेव्हा सांगितले ते पुन्हा सांगतो आमची पार्टी ओरिजनल आहे ती कुणाचा पक्ष फोडून किंवा दुसऱ्या कुणाला आपल्या पक्षात घेऊन आमचा पक्ष वाढलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षातली माणसे आमच्याकडे परत आली ती आमचीच होती त्यामुळे त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रश्‍न येतोच कुठे.' 

नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, राणेच्या भाजप प्रवेशाबद्दल मी यापूर्वीच भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना आजपर्यत जे अनुभव आले त्यातून ते गोड झाले आहेत. सरकारमधील शिवसेनेच्या सहभागाबद्दल ते म्हणाले आमचे मंत्री कामाचा अनुभव घेत आहेत. 2014 मध्ये जनतेची फसवणूक झाली, आम्ही जर सरकारमध्ये सामील झालो नसतो तर भारतीय जनता पक्षाने अन्य राज्यात जशी फोडाफोडी केली आणि सत्ता स्थापन केली तसे इथेही केले असते त्यामुळे आम्ही सत्तेत सहभागी झालो आणि आता जनतेच्या प्रश्‍नावर लढत आहोत. 
 
संबंधित लेख