udhav thakare and shivsena aurangabad | Sarkarnama

औरंगाबादमध्ये बावन्न हजार विद्यार्थ्यांनी रेखाटले उध्दव ठाकरे यांचे चित्र

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त "भगवा तर फडकवणारच' मोहिमेअंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत 52 हजार विद्यार्थांनी सहभाग नोंदव उद्धव ठाकरे यांचे चित्र रेखाटले. एकाच वेळी इतक्‍या मोठ्या संख्येने मुलांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेण्याचा हा विक्रम असल्याचा दाव शिवसेनेने केला आहे. औरंगाबाद शिवसेना शाखेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्याचे चित्र रेखाटण्यासाठी शहरातील विभागीय क्रिडा संकुलात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

175 शाळांमधून तब्बल 52 हजार 500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेच उद्घाटन शिवसेना नेते खासदार चंद्रकां खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगांवकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाची नोंद एक विक्रम म्हणून रेकॉर्ड बुक्‍समध्ये झाली आहे. 

जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशेहून अधिक शिवसैनिकांनी या स्पर्धेच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले. उध्दव ठाकरे यांचे चित्र रेखाटायचे असल्यामुळे मुलांना त्यांचा मुखवटा पुरवण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूध, बिस्कीटाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. 

संबंधित लेख