udhav thakare and cm | Sarkarnama

जनतेला सत्यातले सुख दाखवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : राज्यात आज कष्टाला किंमत राहिली नाही. खचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वप्नातले सुख नव्हे तर सत्यातले सुख दाखवण्यासाठी, त्यांच्या जीवनात समाधानाचे काही क्षण आणण्यासाठी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच पाहिजे. तो मी करणारच आणि मी जे बोलेन ते करुन दाखवणार असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. 

जिल्ह्यातील शिवसेना गटप्रमुखांचा मंगळवारी (ता.23) श्री.ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कनेते विनोद घोसाळकर, मिलींद नार्वेकर, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, मनिषा कायंदे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. ठाकरे म्हणाले, आज आटा महाग तर मोबाईलचा डाटा फुकट झाला आहे. कडूनिंब खाणारीच किड आज देशाला आणि राज्याला लागली आहे, यामुळे शिवसैनिकांचे काम आता सुरु झाले आहे. गावागावात जा, घरोघरी जाउन मतदार याद्यांची तपासणी करा, किती योजनांचा लोकांना लाभ मिळाला आहे, किती योजना फसव्या निघाल्यात याविषयी जनतेची मन की बात बोला, त्यांच्याशी संवाद साधा. 

गटप्रमुख पक्षाचा कणा असून तुमच्या हिमतीवरच विधानसभेवर भगवा फडकावण्याचे मी स्वप्न पाहत आहे. पुढची निवडणुक जिंकण्यात गटप्रमुखांचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. देशातील माता भगिनी, तरुणांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर देशात अराजक येईल, सरकारवरचा जनतेचा विश्‍वास उडेल असा इशारा देखील उध्दव ठाकरे यांनी दिला. 
 
संबंधित लेख