udhav thackray shivaji maharaj statue | Sarkarnama

शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटे उभे केले आहे, उद्धव ठाकरेंनी डागली सरकारवर तोफ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

मुंबई : मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटे उभे करुन ठेवले आहे. तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना इथे रायगड उभा करेल. असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला दिला आहे. 

शिवसेनेतर्फे आज तिथीनुसार छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईतील पश्‍चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारा जवळील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळ्याचं पूजन केल्यानंतर ठाकरे बोलत होते. 

ते म्हणाले, की गेली काही वर्ष शिवजयंतीला शिवभक्त इथे जमतात. आमचे महाराज इथे एकटेच उन्हातान्हात उभे करुन ठेवले आहेत. मात्र आता आम्ही हे पाहणार नाही, आमच्याकडून ते सहन होणार नाही. जीव्हीके, एअरपोर्ट ऑथरिटी यांना आम्ही वारंवार सांगितले. तुमच्याकडून होत नसेल तर शिवसेना इथे रायगड उभारल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या डोक्‍यावरती छत्र बसवण्याची तुमची कुवत नसेल, तर तसे सांगा, शिवप्रेमी ते उभारल्याशिवाय राहणार नाहीत. 

संबंधित लेख