udhav thackray | Sarkarnama

कर्जमाफी, तूर खरेदीवरून शिवसेनेची गोची

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई : शेतकरी कर्जमाफी व तूर खरेदीवरून शिवसेनेच्या भूमिकेतली ससेहोलपट सुरूच असून, आज पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेत सत्तेतली "नुरा कुस्ती' शिवसेनेने कायम ठेवल्याचे चित्र होते. शेतकरी कर्जमाफीवरून रोखठोक भूमिका तर सरकार व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मवाळ भूमिका घेतल्याने शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. 

पक्षातील ग्रामीण भागातल्या आमदारांमधेही या मवाळ भूमिकेवरून प्रचंड अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. केवळ भेटीगाठी घेण्यापेक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक होऊन सरकारमध्ये असल्याचे अस्तित्व दाखवा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मंत्रिमंडळातून बाहेर पडा, असे आवाहन करत विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या मवाळ भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. 

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी राज्यपालांची भेट घेतली. त्याच दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी "वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत कर्जमाफी व तूर खरेदीच्या गोंधळावरून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यासाठी भेट घेतली. विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठक असतानाही शिवसेना मंत्र्यांनी त्या अगोदर मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने मंत्रिमंडळात शिवसेनेची धमक नसल्याची टीका सुरू झाली आहे.  

संबंधित लेख