Uddhav Thakre May Lead the Committee about Avani Death | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

तर 'अवनी' प्रकरणी उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती - सुधीर मुनगंटीवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

गेल्या शुक्रवारी नरभक्षक बनलेल्या अवनी वाघीणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. प्रकरणावरून सध्या राजकारण सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून आणि वन्यजीव प्रेमींकडून जोरदार टीका होत आहे.

चंद्रपूर : वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

गेल्या शुक्रवारी नरभक्षक बनलेल्या अवनी वाघीणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. प्रकरणावरून सध्या राजकारण सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून आणि वन्यजीव प्रेमींकडून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. 

त्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, "उद्धवजी युती सरकारचे महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे.'' विनाकारण यात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

संबंधित लेख