त्यांना कसा आडवा करतो ते पहा : उद्धव ठाकरे 

आमचे राजकारण आहे. आम्हाला जसे पाहिजे तसे राजकारण करू. माझ्या वडिलांनी माझ्या डोक्‍यावर हात ठेवलेला होता. राजकारण कसे करायचे आणि केव्हा करायचे हे त्यांनी मला सांगितले आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही.- उद्धव ठाकरे
त्यांना कसा आडवा करतो ते पहा : उद्धव ठाकरे 

मुंबई : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांनी राजकारण केले, त्यांना मी कसा आडवा करतो ते पहा.'' अशा आक्रमक शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर हल्ला चढवला. 

गोरेगाव येथे शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उद्धव ठाकरे बोलत होते. जर भाजपशी तुमचे पटत नाही तर सरकारमधून बाहेर का पडत नाही? असे लोक मला विचारतात, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, "आमचे राजकारण आहे. आम्हाला जसे पाहिजे तसे राजकारण करू. माझ्या वडिलांनी माझ्या डोक्‍यावर हात ठेवलेला होता. राजकारण कसे करायचे आणि केव्हा करायचे हे त्यांनी मला सांगितले आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही. ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राजकारण केले त्यांना मी कसा आडवा करतो ते पहा.'' 

"शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळवायची आहे, आणि सत्ता मिळवून शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवणारच. मात्र, सत्तेसाठी भगव्याशी तडजोड करणार नाही. भगवा हे सतीचे वाण आहे. सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सत्ता हवी आहे. समविचारी पक्षांशी युती म्हणजे सत्तेसाठी इच्छुकांची युती मला मान्य नाही. अमित शहा मला भेटून गेल्यानंतर पेपरमध्ये वाचले की पवारांचे आमंत्रण आहे. याचा अर्थ शिवसेनेची ताकद वाढत आहे, एवढाच आपण घ्यायचा आहे. जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारे एकत्र येणे गरजेचे आहे.'' असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com