Uddhav Thakray Suspends Two from Shivsena | Sarkarnama

शिवसेनेतून दोघे निलंबित - उद्धव ठाकरे यांची कारवाई

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातले अंतर्गत मतभेद मिटवून पक्षसंघटनेला बळकटी आणण्याचा आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. त्याचेच एक पाऊल म्हणून ही कठोर कारवाई करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतल्याचे बोलले जाते. 

मुंबई - मुंबईचे माजी महापौर व ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलुंडचे उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी यांना निलंबित केले आहे. तसेच तेथील शाखा प्रमुख दीपक सावंत यांनाही पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आले आहे.  

ईशान्य मुंबईत शिवसेनेत अंतर्गत वाद सुरु होते. या वादाला कंटाळून दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. ही कुरबूर उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेल्याने त्यांनी तातडीने कारवाई करत शेट्टी यांना निलंबित केले. तसेच पक्षविरोधी बैठका घेतल्याच्या आरोपाखाली शाखाप्रमुख दीपक सावंत यांनाही निलंबि करण्यात आले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातले अंतर्गत मतभेद मिटवून पक्षसंघटनेला बळकटी आणण्याचा आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. त्याचेच एक पाऊल म्हणून ही कठोर कारवाई करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतल्याचे बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख