Uddhav Thakray Supports Bhagashree Mokate | Sarkarnama

दारुकांड प्रकरणातील संशयित भाग्यश्री मोकाटेला ठाकरेंकडून अभय

मुरलीधर कराळे
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

पांगरमल दारुकांड प्रकरणात मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत शिवसेनेने दखल घ्यावी, यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी शेंडी येथून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोटारसायकल रॅली आणली होती. या रॅलीने ठाकरे यांना निवेदन देवून भाग्यश्री मोकाटे यांच्या पाठिशी पक्षाने उभे राहण्याची विनंती केली.

नगर : "शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे यांना मोक्का लावला. काम करणाऱ्या माणसांना खेचण्याचे काम सरकारने केले. त्या भगिणीने काय खून केले, दरोडे टाकले का. एका भगिणीवर मोक्का लावला, हे सरकारने मोठं पाप केलं. तिला कसा मोक्का लावतात, आणि तिच्यावर कशी कारवाई करतात, ते पाहून घेतो," अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोकाटे यांना अभय दिले. शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त ठाकरे आज नगरला आले होते.

पांगरमल दारुकांड प्रकरणात मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत शिवसेनेने दखल घ्यावी, यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी शेंडी येथून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोटारसायकल रॅली आणली होती. या रॅलीने ठाकरे यांना निवेदन देवून भाग्यश्री मोकाटे यांच्या पाठिशी पक्षाने उभे राहण्याची विनंती केली. याचा उल्लेख ठाकरे यांनी भाषणातून आवर्जून केला. ते म्हणाले, इथे महिलाच सुरक्षित नाहीत. शेतकरी आत्महत्या करतात हे थांबायला पाहिजे. त्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.

हवेतले अंदाज अनेकांचे...अचूकता फक्त 'सरकारनामा'ची - सरकारनामा दिवाळी अंक सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख