uddhav thakare shivsena pramukh | Sarkarnama

मध्यावधी निवडणुका लागल्या तर कर्जमाफी मिळणार नाही - उद्धव ठाकरे

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, मात्र, जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही त्यासाठी मी मध्यावधीला विरोध करत असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांची आज मातोश्रीवर भे घेऊन त्यांचा सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, " शेतकऱ्यांचे हे प्रेम आहे. आशीर्वाद म्हणून हा सन्मान स्वीकारत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने तुमचे आभार मानायला मी पुणतांब्याला येईल. सरकारने घोषणा जरी केली असली तरीही जोपर्यत अंमलबजावणी होत नाही तोपर्यत तुमची एकजूट कायम ठेवा असा संदेशही ठाकरे यांनी पुणतांब्यातील शेतकऱ्यांना दिला. ते पुढे म्हणाले, सरकारने जीआर काढला आहे. त्या जीआरमध्ये काय हवं, काय नको हे तुम्ही ठरवा. जिल्हा बॅंकामधल्या पैशाबद्दल योग्य तो निर्णय लवकर सरकारने घ्यावा. शेतकऱ्यांनी स्वतःला दुर्बल समजू नये, शिवसेना त्यांच्या पाठिशी असल्याचा पुर्नउच्चारही ठाकरे यांनी केला.

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोहन भागवत ही आमची पहिली पसंती आहे. जर भागवत यांच्या नावाला कोणाची अडचण असेल तर त्यांनी स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावं ही आमची मनापासून इच्छा आहे. मात्र अमित शहा यांच्याकडे एखादे चांगले नाव असेल तर त्याचा विचार करण्यात येईल. राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख