Uddhav on Akola Tour | Sarkarnama

अकाेल्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

श्रीकांत पाचकवडे
सोमवार, 15 मे 2017

शासनाकडून शेतकऱ्यांची सातत्याने फसवणुक हाेत आहे. या विराेधात शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. नाशिकला लवकरच शेतकरी प्रतिनिधींची कार्यशाळा हाेत असून, या माध्यमातून थेट शेतकरी शासनाला जाब विचारणार आहेत.

अकाेला - भाजप सरकारच्या शेतकरी विराेधी धाेरणांमुळे शेतकऱ्यांची दैना अवस्था झाली असून, ती दूर करण्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. आज ता. १५ राेजी अकाेल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शासनाकडून शेतकऱ्यांची सातत्याने फसवणुक हाेत आहे. या विराेधात शिवसेनेने आक्रमक पवित्र घेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. नाशिकला लवकरच शेतकरी प्रतिनिधींची कार्यशाळा हाेत असून, या माध्यमातून थेट शेतकरी शासनाला जाब विचारणार आहेत. आज उद्धव ठाकरेंनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या पाठिशी उभे राहावे, न्याय मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली. 

संबंधित लेख