Uddav Thakre to Praise Nashik Shivsena Activists | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

उध्दव ठाकरेंकडून गुरुवारी मातोश्रीवर नाशिकच्या शिवसैनिकांना मिळणार शाबासकी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

शिवसेना पक्षप्रमुख यांचा अयोध्या दौरा हा लोकसभा - विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चांगले 'पॉलीटीकल मायलेज' देणारा उपक्रम ठरला आहे. त्यामुळे पक्षाच्या राम मंदिराचा विषय व शिवसेना दोन्हींची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. सर्वच माध्यमांत शिवसेना आठवडाभर चर्चेत होती.

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौरा यशस्वी झाला. त्यात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन व गर्दीचा मोठा वाटा होता. त्यामुळे ठाकरे बेहद खूष झाले आहेत. त्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्या (ता.29) सायंकाळी मातोश्रीवर पाचारण करण्यात आले आहे. यशस्वी आयोजनासाठी या पदाधिकाऱ्यांना शाबासकी मिळणार असल्याने शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख यांचा अयोध्या दौरा हा लोकसभा - विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने चांगले 'पॉलीटीकल मायलेज' देणारा उपक्रम ठरला आहे. त्यामुळे पक्षाच्या राम मंदिराचा विषय व शिवसेना दोन्हींची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. सर्वच माध्यमांत शिवसेना आठवडाभर चर्चेत होती. प्रचंड संख्येने अयोध्येत दाखल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ते, झळकलेले फ्लेक्‍स, सजावट, शरयू तीरावर करण्यात आलेले उपक्रम व सायंकाळी झालेली आरती याची जबाबदारी नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी सांभाळली होती.

यासाठी नाशिकहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली होती. जाहीर सभा आणि अन्य उपक्रम रद्द करावे लागल्याने शरयु नदीच्या काठी झालेली आरती हाच मुख्य कार्यक्रम ठरला. त्याच्या संयोजनात नाशिकच्या शिवसेनेने यशस्वी केल्याने पक्ष प्रमुख ठाकरे खूष आहेत. त्याचा भाग म्हणुन उद्या (ता. 29) मुंबईत मातोश्री निवासस्थानी सायंकाळी सत्कार व मेजवानी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.  

संबंधित लेख