Udayanraje's Bhaubij | Sarkarnama

मनीषाराजेंनी केले उदयनराजेंचे औक्षण! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या भगिनी मनीषाराजे पाटील- भोसले यांनी आज औक्षण करुन भाऊबीज साजरी केली. 

नाशिक : खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या भगिनी मनीषाराजे पाटील- भोसले यांनी आज औक्षण करुन भाऊबीज साजरी केली. 

खासदार उदयनराजे यांच्या भगिनी मनीषाराजे धनंजय पाटील-भोसले यांचे कुटुंबीय नाशिकला असतात. त्यामुळे भाऊबीजेसाठी खासदार उदयनराजे नाशिकला आले आहेत. आज सकाळी त्यांना मनीषाराजे यांनी औक्षण केले. यावेळी उदयनराजेंची चिरंजीव वीरप्रताप राजे, पत्नी दमयंतीराजे यांसह अन्य कुटुंबीय उपस्थित होते. 

खासदार उदयनराजे नाशिकला असल्याने त्यांचे चाहते तसेच सामाजिक, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांची त्यांना भेटण्यासाठी तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र आज सकाळचा वेळ त्यांनी कटाक्षाने कुटुंबियांसमवेत व्यतीत केला. भगिनीने केलेल्या औक्षणानंतर कुटुंबियांशी गप्पा मारत अत्यंत हलक्‍या फुलक्‍या वातावरणात त्यांनी भाऊबीजेचा आनंद घेतला. 

संबंधित लेख