udayanraje bhosale | Sarkarnama

उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर

सरकारनामा
सोमवार, 8 मे 2017

सातारा : आपल्या उद्योगी कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी काल (रविवारी) पुण्यात आपल्या निवडक निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जाहीर भाजप प्रवेशाचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

सातारा : आपल्या उद्योगी कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी काल (रविवारी) पुण्यात आपल्या निवडक निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जाहीर भाजप प्रवेशाचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

राजकीय कारकीर्द ज्या पक्षातून सुरू केली त्याच पक्षाने आता अडचणीच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. खंडणी प्रकरणात अडचणीत आलेले उदयनराजे भोसले यांच्यावर राजकीय अस्तित्वासाठी भाजप प्रवेशाची वेळ आली आहे. 
सध्या ते खंडणी प्रकरणात अटक टाळण्यासाठी अज्ञातवासात आहेत. केवळ काही निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आहेत. त्यांना जामीन मिळावा, यासाठी माजी सभापती सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष ऍड. दत्तात्रेय बनकर हे प्रयत्न करत आहेत. उदयनराजेंचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरवातीला ते भारतीय जनता पक्षात होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते सलग दोन पंचवार्षिक खासदार म्हणून सातारा मतदारसंघातून निवडून आले. प्रत्येक वेळी निवडून आल्यावर उदयनराजेंकडून नेहमी चुका होत गेल्या. मी कोणताच पक्ष मानत नाही. जनता हाच माझा पक्ष, असे ते सांगत. याचा अर्थ पक्षातील स्थानिक नेत्यांनी घ्यायचा तो घेतला. नगरपालिका निवडणुकीत दोन राजांचे मनोमीलन तुटले. या तुटलेल्या मनोमिलनानंतर त्यांच्या राजकीय अस्तित्वाला घरघर लागली. 

जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना काठावरचे यश मिळाले. त्याच दरम्यान राष्ट्रवादीनेही त्यांना पक्षातून बेदखल केले. या सर्व घडामोडीतून उदयनराजेंना एकटे पाडले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र राहून राष्ट्रवादीच्या विरोधकांची कॉंग्रेसच्या मदतीने मोट बांधण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. याच दरम्यान, खंडाळ्यातील सोना अलाईज कंपनीच्या मालकास खंडणी मागितल्या प्रकरणात ते व त्यांच्या चार समर्थकांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जामीन मिळविताना त्यांची चांगलीच ससेहोलपट झाली. सर्व फासे उलटे पडू लागले. परिणाम उदयनराजेंची अटक अटळ असल्याने त्यांनी अज्ञातवासात राहणे पसंत केले. याच कालावधीत त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यात सुरवातीला यश मिळाले नाही. पण आता काही अटींवर भाजपच्या नेत्यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करण्याची तयारी दर्शविली आहे. हा प्रवेश लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने आधी होणार की आत्ताच होणार याचीच सातारकरांना 
उत्सुकता आहे. 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख