udayanraje bhosale | Sarkarnama

उदयनराजेंसाठी समर्थकांची धावाधाव

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 मे 2017

सातारा : खंडणी प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांना जामीन मिळविण्यासाठी त्यांचे समर्थक कसोशीने प्रयत्न करत आहेत. उदयनराजेंना या प्रकरणात राजकीय हेतूने गोवल्याचे पुरावे घेऊन त्यांचे समर्थक विविध पक्षांच्या नेत्यांकडे हेलपाटे मारत आहेत. भिलारच्या कार्यक्रमावेळी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंना या प्रकरणातून सोडविण्याची विनंती केली. 

खंडाळा तालुक्‍यातील सोना अलाइज कंपनीच्या मालकाकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर आहे. या प्रकरणात त्यांचे काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. खासदार उदयनराजे मात्र पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. त्यांना अटक होऊ नये म्हणून जामीन मिळविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत.

न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक होणार हे निश्‍चित आहे. पण ही अटक टाळण्यासाठी खासदार समर्थक भारतीय जनता पक्षांच्या मंत्र्यांपासून ते अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन आले. पण त्यांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही.

मुख्यमंत्री नुकतेच भिलारच्या दौऱ्यावर असताना खासदारांचे निष्ठावंत सुनील काटकर व ऍड. दत्तात्रेय बनकर यांनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. एकीकडे समर्थक उदयनराजेंना या प्रकरणातून सोडविण्याचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, उद्योगी लोकांना दूर ठेवा, अन्यथा अडचणीत याल, असा सल्ला दिला आहे. 
 
संबंधित लेख