पार्थ यांच्या प्रचारात उदयनराजे; म्हणाले देशाला परिवर्तनाची गरज

पार्थ यांच्या प्रचारात उदयनराजे; म्हणाले देशाला परिवर्तनाची गरज

पिंपरी: : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांपासून मन की बात करत होते. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या मनात धन की बात होती.त्यांचे सरकार बिझनेस इंडिया कंपनी असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये केली. 

मावळमधील राष्ट्रवादीचेे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारसभेेे उदयनराजेे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पार्थ पवार, आदी उपस्थित होते. अवकाळी पावसाने ही सभा उशीरा सुुुरुु झाली. दोनवेेळा पावसामुुळेे ती थांंबवावी लागली.

उदयनराजे म्हणाले, ``मन की बातच्या माध्यमातून भाषणे करत मोदींनी जनतेची फसवणूक केली. देशातील युवकांना दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा केले नाहीत. अच्छे दिनच्या नावाखाली मते मागणाऱ्या या मंडळींना जनतेने बहुमताने निवडून दिले होते. मात्र, लोकसभेत विराजमान होता त्यांनी जनतेकडे पाठ फिरवत तो मी नव्हेच अशी भूमिका घेत केसाने त्यांचा गळा कापला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या मताची किंमत नाही. या सत्ताधाऱ्यांनी देश विकला असून मूठभर लोकांचे खिशे भरण्याचे काम केले आहे. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे देशाची अवस्था सुधारायची असेल तर परिवर्तनाखेरीज गत्यंतर नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com