udayanraje and ramraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

उदयनराजे रामराजेंना "जादू की झप्पी' देणार होते ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. उदयनराजे हे विरोधकांना आपल्या स्टाईलमध्ये भेटण्यास प्रसिद्ध आहेत. सोमवारी ते रामराजेंना भेटणार होते, मात्र कार्यकत्यांनी चतुराईने ही भेट टाळली. 

सातारा : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. उदयनराजे हे विरोधकांना आपल्या स्टाईलमध्ये भेटण्यास प्रसिद्ध आहेत. सोमवारी ते रामराजेंना भेटणार होते, मात्र कार्यकत्यांनी चतुराईने ही भेट टाळली. 

सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान खासदार उदयनराजे भोसले शासकीय विश्रामगृहावर आले. त्यावेळी त्यांना विश्रामगृहात सभापती रामराजेही असल्याची माहिती मिळाली. त्यावर उदयनराजेंनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांना भेटून जादू की झप्पी देऊन येतो, असे त्यांच्या समवेत असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. पण काहीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत खासदारांना रोखले. आपण तेथे नको जायला महाराज, अशी विनंती केली. महाराजांनीही कार्यकर्त्यांचे ऐकले आणि विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावर उदयनराजे निघून गेले ! 

संबंधित लेख