udayanraje and laxman mane | Sarkarnama

राजे तुम्ही बोला पण जरा विचार करून बोला. तुम्ही खासदार आहात - लक्ष्मण माने

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे दिलदार नेतृत्व आहे. धनगर समाजाच्या आरक्षणावर त्यांनी मागासवर्गीय आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याबद्दल त्यांचा आम्ही वंचीत बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो. राजे तुम्ही बोला पण जरा विचार करून बोला. तुम्ही खासदार आहात. मागासवर्गीयांच्या आरक्षणावर बोलायचं असेल तर संसदेत बोला, असा सल्ला माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

श्री. माने म्हणाले, आज सरकारच्या धोरणामुळे नोकऱ्या मिळत नाहीत. कागदावर रिझर्वेशन राहिले आहे. आर्थिक निकषांवर सवलती द्या अशी पूर्वी चर्चा झाली होती. घटनेने आम्हाला अधिकार दिले आहेत. तो कुणाला बोलण्याचा अधिकार नाही. उद्योगपतींनी नफा सरकारच्या थेट तिजोरीत जमा करावा. ब्राम्हणांनी देवळावरचा अधिकार काढावा, मग आमचे आरक्षण काढा. उदयनराजे यांच्याबद्दल बोलताना त्यांना आवाहान करत ते म्हणाले, "" जनता तुम्हाला मान देते म्हणून तुमचे राजेपण टिकून आहे. आम्ही तुम्हाला मानणारे लोक आहोत. महाराज तुम्ही ब्राम्हणांच्या बाजूने बोलता म्हणून जातीवादी सरकार सत्तेवर आले आहे. राजे तुमच्यावर आमचे प्रेम आहे. बोलताना विचार करून बोला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वंचीत बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातही उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार उभा करणार आहे, असेही माने यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख