Udayan Raje is king , he won't indulge in corruption : Bhayyuji Mahajraj | Sarkarnama

उदयनराजे हे राजे आहेत, दोन लाखांच्या  भानगडीत कशाला पडतील ? :  भय्युजी महाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

औरंगाबाद  : ""उदयनराजे आणि मी जिवलग मित्र आहोत. ते राजे आहेत; दोन लाखांच्या भानगडीत कशाला पडतील? '', असे वक्‍तव्य भय्युजी महाराज यांनी उदयनराजेंवरील खंडणीच्या आरोपांचे खंडन करताना केले. आपण त्यांच्या सोबत असल्याची पुष्टीही त्यांनी या प्रसंगी जोडली. 

भय्युजी महाराज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते . भय्यूजी महाराज विविध प्रश्नांची उत्तरे देताना म्हणाले, "कोपर्डी येथे नारी अस्मितेचे प्रतीक उभे करायचे होते. तशी इच्छा त्या मुलीच्या आई-वडिलांची होती. मात्र, त्या गोष्टीचे राजकारण झाल्यानंतर, लोकभावना समजून तो विषय संपविण्याचा निर्णय घेतला. मी जातिव्यवस्था मानत नसल्यानेच भारताचा नागरिक आहे. कोपर्डीप्रकरणी माझी मर्यादा अन्यायापुरती आहे. ती माणुसकीशी निगडित होती. जातीय मोर्चामुळे महाराष्ट्र कधी विभागला जाणार नाही. कारण आधार स्वराज्याचा आहे. अठरापगड जातींतून शिवरायांनी स्वराज्यातून निर्मिती झाली होती.'' 

"अन्न आणि पाण्याचे नियोजन नसल्यानेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, सूर्योदय परिवार या प्रश्‍नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. कर्जमाफी ही वारंवार होऊ शकत नाही; तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरावर विवेचन होत नाही, तोपर्यंत आरक्षणावर बोलून काहीच उपयोग नाही'', असे भय्युजी महाराज म्हणाले. 

संबंधित लेख