two wheeler rallay in pune | Sarkarnama

पुण्यात बंदच्या दिवशी निघणार भव्य टू व्हिलर रॅली

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा आंदोलनासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पूर्वी भव्य टू व्हिलर रॅली काढण्यात येणार आहे. बंदसाठी आयोजकांनी आचारसंहिता जारी केली आहे. या बंदमध्ये हिंसा सहन केली जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात सकल मराठा समाजाच्या शिवाजीनगर विभागातफेर् भव्य टू व्हिलर रॅली काढण्यात येणार आहे. ही टू व्हीलर रॅली ९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जगलीमहाराज मंदिरापासून चालू होईल 

तिचा मार्ग पुढीलप्रमाणे :  जंगलीमहाराज मंदिरापासून डेक्कन छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याला अभिवादन ,गुडलक चोक मार्ग तुकाराम पादुका चोक, शेतकी कॉलेज चौक, गणेशखिड मार्गाने पुणे विद्यापीठला वळसा घालून, चाफेकर नगर, सिमला ऑफिस चोक ,शिवाजीनगर एसटी स्टँड , वाकडेवाडी भुयारी मार्ग ,शासकीय दूध डेरीला वळसा घालून वाकडेवाडी रोडमार्ग पाटील इस्टेट उडणपूल, संचेती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असेल.  जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन होईल

 

बंदसाठी आचारसंहिता

 

 • बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
 • बंद मध्ये कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमतेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये
 • प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे आहे
 • कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
 • पोलीस प्रशासनला सहकार्य कऱयाचे आहे
 • बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
 • सोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करायची आहे
 • अफवांवर विश्वास ठेवू नका
 • मराठा सेवकांनी शांत राहून ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा आहे
 • आपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये
 • आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही,हातातोंडाशी आलेला घास खायला आपण असणे महत्त्वाचे आहे
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख