Two Maratha youth try to kill themselves in Kannad | Sarkarnama

कन्नड तालुक्‍यात आणखी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न 

सरकारनामा
मंगळवार, 24 जुलै 2018

मंगळवारी (ता.24) देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे रास्तारोको आंदोलना दरम्यान आणखी दोन आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 

औरंगाबादः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु झालेल्या दुसऱ्या टप्यातील आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. सोमवारी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी आंदोलनात आपला जीव गमावल्यानंतर मंगळवारी (ता.24) देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे रास्तारोको आंदोलना दरम्यान आणखी दोन आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. 

कायगांव टोका येथील गोदापात्रात उडी घेऊन जीव गमावलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होत नाही तोच आणखी दोन आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न कन्नड तालुक्‍यातील देवगांवरंगारी येथे केला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवगाव रंगारी येथे जुन्या निजाम पुलावरून रास्तारोको आंदोलन सुरू होते. यावेळी जयेंद्र सोनवणे (28) या तरुणाने पुलावरून कोरड्या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. 

तर दुसऱ्या घटनेत जगन्नाथ विश्‍वनाथ सोनवणे (55) यांनी देखील विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांनाही तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख