two friends in trouble after sudhnva`s arrest | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

सुधन्वाच्या मैत्रीमुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन मित्र आले अडचणीत 

उमेश घोंगडे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : दहशतवादी कारवाया करण्यासाठी शस्त्रसाठा जमा करणाऱ्या संशयित सुधन्वा गोंधळेकर याच्या मैत्रीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील दोन तरूणांना बसला. दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी या दोन तरूणांची शनिवारी नातेपुते (जि. सोलापूर) जाऊन चौकशी केली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातून ताब्यात घेतलेला सुधन्वा गोंधळेकर सात ऑगस्ट रोजी नातेपुते येथील या मित्रांकडे जेवायला होता. 

नातेपुते येथील हा मित्र पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना त्याची सुधन्वाशी मैत्री झाली होती. तेव्हापासूनची त्यांची मैत्री होती. मात्र सुधन्वा सध्या नेमके काय "उद्योग' करतो याची कल्पना या मित्राला नव्हती. व्यवसायानिमित्ताने या भागात आल्यानंतर तो या मित्राकडे येत असे.

त्याप्रमाणे तो सात ऑगस्टला आला होता. त्यावेळी नातेपुतेमधील आणखी एक मित्र होता. या दोन मित्रांनी सुधन्वाला घरी जेवायला नेले. तिघे एकत्र जेवळे. जेवण करून दोन तासांनी तो परतला. पुढच्या दोन-तीन दिवसातच नालासोपारा येथून सुधन्वाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मिळालेल्या कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिस सुधन्वाला नातेपुते येथे घेऊन गेले. या दोन मित्रांची चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

सुधन्वाचे हे केवळ मित्र आहेत हे लक्षात आल्यानंतर पोलिस परत आले. मात्र दहशतावाद विरोधी पथकाचे पोलीस गावात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ओळखीच्या अनेकांनी या दोन मित्रांच्या घरी धाव घेतली. या दोन मित्रांपैकी एकजण स्थानिक पतसंस्थेत काम करतो तर दुसऱ्याचे फर्निचरचे दुकान आहे. हे दोघांना आम्ही लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेच चुकीचे काम होणार नाही, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख