महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री आता राज्यसभेत 

महाराष्ट्रातून राज्यसभेची निवडणूक आज बिनविरोध झाली. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे आता काॅंग्रेसचा किल्ला या सदनात लढवतील. आक्रमक राणे हे भाजपचे उमेदवार म्हणून सत्ताधाऱ्यांची बाजू मांडतील.
महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री आता राज्यसभेत 

पुणे : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठीची निवडणूक आज बिनविरोध झाली. भाजपच्या उमेदवार विजया रहाटकर यांनी माघार घेतल्याने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले. याशिवाय कॉंग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचीही बिनविरोध निवड झाली. 

या निवडणुकीसाठी भाजपच्या तीन जागा सहज निवडून येणार होत्या. मात्र विजया रहाटकर यांनी अर्ज भरल्याने रंगत वाढली होती. मात्र एखाद्या भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून रहाटकर यांचा अर्ज भरण्याचे भाजपच्या श्रेष्ठींनी ठरविले होते. भाजपच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज पात्र ठरल्याने रहाटकरांनी ठरल्यानुसार आपला अर्ज माघारी घेतला. त्यांची माघार होईपर्यंत इतर पक्षांचे उमेदवार मात्र धास्तीत होते. ही निवडणूक झाली असती तर अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्‍यता होती. 

नारायण राणे हे राज्यसभेवर गेल्याने महाराष्ट्राचे माजी दोन मुख्यमंत्री आता राज्यसभेत असणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत आता राणेही राज्यसभेत आपला प्रभाव दाखवतील. या आधी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे हे देखील राज्यसभेत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राज्यसभेत होते. मात्र ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी राज्यसभेवर गेले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com