twenty lakhs voters name in voterlist is lose | Sarkarnama

मुंबईच्या मतदार यादीतून 20 लाख मतदारांची नावे गायब 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई : मुंबई शहरातील सर्व मतदारसंघातील 20 लाख मतदारांची नावे मतदारयादीतून गायब करण्यात आलेली असून हे भाजप सरकारचे मोठे षडयंत्र आहे. असा आरोप संजय निरुपम यांनी भाजप सरकारवर केला. 

मतदारयादीमध्ये झालेल्या घोळासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या आमदार आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मंबुई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन त्यांना या मतदारयाद्यांचे पुनर्निरीक्षण करण्याचे निवेदन दिले. 

निरूपम म्हणाले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची प्रमुख मागणी केली आहे की, ज्या 20 लाख लोकांची नावे वगळण्यात आलेली आहेत, त्यातील किती खरे मतदार आहेत, किती बोगस आहेत, ते आम्हाला माहित नाही. पण ज्यांची नावे काढून टाकली आहेत. ती सार्वजनिकरित्या जाहीर करावीत. कोणाकोणाची नावे वगळण्यात आलेली आहेत, ते जनतेला कळायला पाहिजे आणि जे प्रामाणिक मतदार आहेत, त्यांची नावे जर मतदारयादीतून वगळलेली असतील, तर तसे करण्याचा सरकारला काही अधिकार नाही. 

तसेच मुंबईत एसआरए अंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकास सुरु असल्यामुळे येथील लोक दुसरीकडे राहायला गेलेले आहेत. अशा वेळेस निवडणूक विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी जेव्हा वोटर व्हेरिफिकेशन साठी या ठिकाणी जातो, तेव्हा त्यांना येथे राहणारा व्यक्ती दिसत नाही. तेव्हा त्याचे नाव मतदारयादीतून काढले जात आहे. तो व्यक्ती मुंबईचा प्रामाणिक मतदार आहे. अशा प्रकारे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि कॉंग्रेसला मानणाऱ्या मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांची नावे जाणून बुजून मतदार यादीमधून वगळली जात आहेत. हे एक फार मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही निरूपम यांनी यावेळी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख