कामतांच्या मतदारसंघासाठी कृपाशंकर आणि निरुपम यांच्यात रस्सीखेच 

Krupashankar-Nirupam
Krupashankar-Nirupam

मुंबई:  गुरुदास कामत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर मला संधी द्या अशी विनंती कृपाशंकर सिंग यांनी केली आहे. 

मुंबईत लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या नेत्यांच्या मुलाखती झाल्या तेव्हा कृपाशंकर सिंग यांनी स्वतःच स्वतःचे नाव पुढे केले.

 मुंबई अध्यक्ष असल्याने काही वर्षांपूर्वी आपण हा मतदार संघ लढवू शकलो नव्हतो. आता मात्र येथे आपल्याला संधी मिळावी असा त्यांचा दावा आहे.

 विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांनीदेखील याच मतदारसंघावर दावा केला आहे, असे समजते. 

मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड यांची नावे त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी पुढे केली असताना कृपाशंकर यांनी स्वतःच स्वतःसाठी उमेदवारी मागितली आहे हे उल्लेखनीय.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com