Tussle for candidature among Gavande - Dhone | Sarkarnama

गावंडे -ढोणे या  दाेन मित्रांमध्येच काँग्रेसच्या तिकिटासाठी  रस्सीखेच

श्रीकांत पाचकवडे  : सरकारनामा ब्‍युराे
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

विशेष म्हणजे संंग्रामभैया गावंडे अाणि डॉ. सुधीर ढाेणे हे जिवलग मित्र असून त्यांच्यातच रस्सीखेच सुरू झाल्याने या रणसंग्रामात काेण बाजी मारताे? हे पाहणे अाैत्सुक्‍याचे ठरणार अाहे.

अकाेला  :  अागामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अाहे. विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे अाणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढाेणे यांच्यात मतदारसंघ अापल्‍याकडे घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली अाहे. 

विशेष म्हणजे संंग्रामभैया गावंडे अाणि डॉ. सुधीर ढाेणे हे जिवलग मित्र असून त्यांच्यातच रस्सीखेच सुरू झाल्याने या रणसंग्रामात काेण बाजी मारताे? हे पाहणे अाैत्सुक्‍याचे ठरणार अाहे.

अागामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून माेर्चेबांधणी सुरू झाली अाहे. गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघ भारिप बहुजन महासंघाचे अामदार बळीराम सिरस्कार यांनी ताब्यात ठेवला अाहे. मात्र, अागामी निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ अाणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अाघाडी न झाल्यास या मतदारसंघावर काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावेदारी करण्याची तयारी सुरू अाहे. काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात बाळापुर मतदारसंंघ काँग्रेसकडे अाहे.

मात्र, या मतदारसंंघात काँग्रेसचा सातत्याने पराभव हाेत असल्याने राष्ट्रवादीकडे असलेला मुर्तीजापूर मतदारसंंघ काँग्रेसला साेडत त्याबदल्यात बाळापूर मतदारसंघ घेण्याची व्युहरचना संग्रामभैया गावंडे यांनी अाखली अाहे. त्यादृष्टीनेच त्यांनी गेल्या दीड  वर्षांपासून या मतदारसंंघात सभा, बैठकांचा धडाका लावत जाेरदार माेर्चेबांधणी सुरू केली अाहे.  माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना माणणारा माेठा वर्ग या मतदारसंघात असून ही संग्राम गावंडे यांच्यासाठी जमेची बाजु अाहे.

तर दुसरीकडे डॉ. सुधीर ढाेणे यांनीही मतदारसंघात माळी, कुणबी, मुस्लीम समीकरण जाेडण्यावर भर दिला असल्याने दाेघांमध्येही मतदारसंघ घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली अाहे.  संग्रामभैया गावंडे अाणि डॉ. सुधीर ढाेणे हे जिवलग मित्र म्हणून अाेळखल्या जातात.

 अाठ महिन्यांपुर्वी गावंडे अाणि ढाेणे यांच्या पुढाकारातून पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची अकाेल्यात एल्गार परिषद घेतली हाेती. या परिषदेच्या माध्यमातून सत्‍ताधारी भाजपविरुद्ध माेठी वातावरण निर्मिती करण्यात संग्राम गावंडे अाणि डॉ. ढाेणे यशस्वी झाले हाेते. मात्र, अाता बाळापुर मतदारसंघासाठी दाेन मित्रांमध्येच रस्सीखेच सुरू झाल्याने उमेदवारी मिळविण्यात काेण बाजी मारताे? यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगत अाहे.

संबंधित लेख