लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या भांडणात बाळा भेगडेंना मंत्रिपदाचा गोळा!

लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या भांडणात बाळा भेगडेंना मंत्रिपदाचा गोळा!

पुणे : पुणे जिल्ह्यातून भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. पण या मंत्रिमंडळ समावेशासाठी गेली साडे चार वर्षे वाट पाहणारे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघांच्याही तोंडाला पाने पुसली गेली आहेत. खरे तर या दोघांच्या भांडणामुळेच पिंपरी-चिंचवडला मंत्रीपद देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले असावे, अशी चर्चा आहे.

जगतापांना मंत्री केले तर लांडगे नाराज होणार आणि लांडगेंना संधी दिली तर जगताप हे रुसणार, अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळेच या दोघांनाही मंत्री करण्याचे टाळल्याचे सांगण्यात येते.

या दोघांनाही पक्षात घेताना चांगली संधी देण्याचे आश्वासन मिळाले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर जगतापांना मंत्रिपद मिळणार, अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. तेव्हाही काही झाले नाही. नंतर लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करा. मग विचार करतो, असे जगतापांना सांगण्यात आले. त्यांनी चिंचवडमधून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जोरदार मताधिक्य मिळवून दिले. तरीही काहीच पदरी पडले नाही. महेश लांडगे यांच्याही बाबतीत असे झाले. आता या दोघांनाही 2019 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच पुन्हा आता वाट पाहावी लागेल. 

भेगडे यांचे नाव सुरवातीपासून चर्चेत होते. त्यांना पावणे पाच वर्षांनंतर मंत्रिपदी संधी मिळाली. मदन बाफना यांच्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर मावळ विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com