tur kharedi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

नगर जिल्ह्यात सरकारकडून तुरीचे 23 कोटी देणे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

नगर : तूरखरेदीचे भिजत घोंगडे नगर जिल्ह्यातही तसेच आहे. नऊ खरेदी केंद्रावर नोंदणी झालेली 25 हजार 477 क्विंटल तूर अद्याप तशीच आहे. केंद्रावर 22 एप्रिलनंतर आलेल्या तुरीबाबतही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचे देणे सरकारला द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात तुरखरेदीचा गोधळ कायम सुरूच आहे. 

नगर : तूरखरेदीचे भिजत घोंगडे नगर जिल्ह्यातही तसेच आहे. नऊ खरेदी केंद्रावर नोंदणी झालेली 25 हजार 477 क्विंटल तूर अद्याप तशीच आहे. केंद्रावर 22 एप्रिलनंतर आलेल्या तुरीबाबतही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचे देणे सरकारला द्यावे लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात तुरखरेदीचा गोधळ कायम सुरूच आहे. 
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरेदी करावा लागली. त्यानुसार नऊ केंद्रांवर एक हजार 885 शेतकऱ्यांकडून 25 हजार 477 क्विंटल तूर आल्याची नोंद झाली. ही तूर तात्काळ खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे राहुरी, श्रीरामपूर, पारनेर, पाथर्डी, जामखेड, नगर, नेवासे व कर्जत येथील केंद्रावर तूर खरेदी केली जाणार आहे. त्यातील राहुरी, श्रीरामपूर व पारनेर येथील केंद्रे बंद आहेत. पाथर्डी केंद्रावर दोन हजार 884 , जामखेड केंद्रावर दोन हजार 500 नगर केंद्रावर नऊ हजार सहा, नेवासेमध्ये दोन हजार 600, शेवगावच्या केंद्रावर एक हजार 812 तर कर्जत केंद्रावर सहा हजार 675 क्विंटल तूर खरेदी करण्यास सुरूवात झाली आहे. या नोंदणी झालेल्या तुरीची किंमत सुमारे 111 कोटी 61 लाख रुपये एवढी आहे. त्यापैकी शेतकऱ्यांना 89 लाख 68 हजार रुपये देण्यात आले आहेत. त्यातील 23 कोटी रुपयांची देयके बाकी आहेत. ते शेतकऱ्याना टप्प्याटप्प्याने दिले जातील, असे पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. 
दोन ट्रक पकडले 
नगर-मनमाड रोडवर बुधवारी तूर घेऊन जाणाऱ्या दोन मालमोटारी पकडल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने ही कारवाई केली आहे. दोन्ही ट्रक सध्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत. त्यातील 21 लाख रुपयांची तूर पाथर्डी बाजार समितीच्या केंद्रातील असल्याचे समजते. तुर खरेदी केल्याचे संबंधितांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे समजते. 
प्रताप ढाकणे भडकले 
पाथर्डी बाजार समितीत खरेदी केलेल्या तुरीच्या दोन मालमोटारी चार दिवस कोठे होत्या, ही तूर ठेवून घेणारा कोण, असे प्रश्न बाजार समितीचे संचालक प्रताप ढाकणे यांनी उपस्थित केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करून तूर शासकीय गोदामात जमा करावी व शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्याला अर्ज दिला आहे. 
 

संबंधित लेख