tur gr | Sarkarnama

तूर खरेदी सुरू न झाल्याने सरकारी आदेशाची होळी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही आज (ता. 28) सायंकाळपर्यंत पैठण येथील खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू न झाल्यामुळे अन्नदाता शेतकरी संघटनेने तूर खरेदी आदेशाची होळी करत सरकारचा निषेध केला. 
22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या तुरीची खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजार समिती, सहकार निबंधक, तहसीलदार यांना दिले 

आहेत. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत पैठण येथील केंद्रावर तूर खरेदी सुरू झाली नव्हती. याचा निषेध म्हणून अन्नदाता शेतकरी संघटनेने तालुका उपनिबंधक कार्यालयासमोर शासनाच्या तूर खरेदी आदेशाची होळी केली. वेळोवेळी नवे आदेश, अटी, नियम लादत सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे.तूर खरेदी केली जाणार म्हणून शेतकरी रणरणत्या उन्हात आपली पोती गाडीत टाकून वाट पाहतोय. मात्र दिवसामागून दिवस उलटत असले तरी तूर खरेदी काही केली जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना गाडी भाड्याचा नाहक भुर्दंड बसतोय. तूर खरेदीला आणखी उशीर झाला तर शेतकऱ्याचे अर्धे पैसे गाडी भाड्यातच जातील परिस्थिती असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

संबंधित लेख