Tukaram Mundhe's Laughter Caputred | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

...आणि तुकाराम मुंढेंचे दुर्मिळ हास्य नाशिककरांनी टिपलेच! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नेते फोटोसाठी पोज देण्यात गुंतले होते. मात्र पोजची व छायाचित्राची प्रतिक्षा करतील ते मुंढे कसले. त्यांनी कात्री हाती पडताच फीत कापली. नेते मात्र ही कापलेली फीत हाती घेऊन प्रतिक्षा करीत होते. फित कापल्याचे छायाचित्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर सगळेच खळाळुन हसले. त्यात गंभीर स्वभावाचे तुकाराम मुंढे यांचे तर सात मजली हास्य होते.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा वावर सदैव शिस्तबद्ध अन्‌ गंभीर. राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थिती तर त्याहुनही गंभीर. मात्र, या सगळ्यांना छेद देणारा प्रसंग आज घडला अन्‌ ते नेत्यांसोबत खळाळून हसले. एव्हढेच काय त्यांनी शिवसेनेच्या गटनेत्याला टाळीही दिली. त्यामुळे हा दुर्मिळ प्रसंगाचे साक्षीदार ठरलेले नागरीक हा प्रसंग मोबाईलमध्ये चित्रीत करण्याचा मोह आवरु शकले नाहीत. 

प्रसंग होता स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीन सायकल प्रकल्पाचे उद्‌घाटन. गोल्फ क्‍लब मैदानाजवळ उभारलेल्या फलकांच्या गॅलरीत त्यासाठी लाल फित लावण्यात आली होती. नेते संयुक्तपणे फीत कापुन त्याचे उद्‌घाटन करणार होते. छायाचित्रकार, व्हीडीओग्राफर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमाच्या प्रतिनिधींनी हा क्षण टिपण्यासाठी गर्दी केली होती. महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक गुरमितसिंग बग्गा यांसह आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हाती संयोजकांनी कात्री दिली. 

नेते फोटोसाठी पोज देण्यात गुंतले होते. मात्र पोजची व छायाचित्राची प्रतिक्षा करतील ते मुंढे कसले. त्यांनी कात्री हाती पडताच फीत कापली. नेते मात्र ही कापलेली फीत हाती घेऊन प्रतिक्षा करीत होते. फित कापल्याचे छायाचित्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर सगळेच खळाळुन हसले. त्यात गंभीर स्वभावाचे तुकाराम मुंढे यांचे तर सात मजली हास्य होते. यावर 'तुम्ही नेहेमीच सगळ्यांच्या पुढे' असे म्हणत अजय बोरस्तेंनी मुंढेंना टाळीही दिली. उपस्थित नाशिककर या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार ठरले. मात्र काही वेळातच त्यांनी तो क्षण शहरभर पसरवला. 

संबंधित लेख