नाशिकला सलग तीन वर्ष काम करायला आवडेल : तुकाराम मुंढे यांची भावना

नाशिकचे आयुक्तपद ही मोठी जबाबदारी मिळाली असून आता नाशिकला सलग तीन वर्षे काम करायला आवडेल, अशा भावना पीएमपीएमएलचे मावळते अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
नाशिकला सलग तीन वर्ष काम करायला आवडेल : तुकाराम मुंढे यांची भावना

पुणे : नाशिकचे आयुक्तपद ही मोठी जबाबदारी मिळाली असून आता नाशिकला सलग तीन वर्षे काम करायला आवडेल, अशा भावना पीएमपीएमएलचे मावळते अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. 

तुकाराम मुंढे यांची काल शासनाने नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक केली. मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाच्या काळात पी
एमपीएमएलच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अल्पकाळातच त्यांची बदली झाली. यापूर्वी नवी मुंबईचे आयुक्त म्हणून काम पहात असताना मुंढे यांची मुदतीपूर्वी बदली झाली होती. 

पीएमपीचा घसरलेला गाडा पुन्हा सुधारणांच्या 'ट्रॅक'वर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा अधिकारी, अशी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची प्रतिमा अल्पावधीत निर्माण झालेली असतानाच, राज्य सरकारने अवघ्या 11 महिन्यांतच त्यांची अनाकलनीयरीत्या बुधवारी बदली केली. नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंढे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची नियुक्ती झाली आहे.

या बदलीनंतर बोलताना मुंढे म्हणाले, "बदली कधी होईल हे अधिकाऱ्यांच्या हातात नसते. पीएमपीमध्ये आयटीएमएसची उत्तम अंमलबजावणी करता आली. आता मोठी जबाबदारी मिळाली असून, मी आनंदी आहे. आव्हानात्मक जबाबदारी, काम करायला वाव आहे. पीएमपीचा अध्यक्ष असताना प्रवासी विरोधी असल्याचा आरोप झाला, पण एकही निर्णय प्रवासी विरोधी घेतला नाही. तोटा कमी करण्यात मोठे यश मिळाले. ठेकेदारांच्या गाड्यांना शिस्त आणली. आता 3 वर्षे सलग नाशिकला काम करायला आवडेल."

"माझ्या कार्यकाळात पीएमपीएमएलमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले. जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर आणण्याचा कायम प्रयत्न राहिला. संस्था बळकट करण्यासाठी विविध निर्णय घेतले. संस्थेला शिस्त लावली, कामचुकरांना बाजूला केले. चांगलं काम करण्याऱ्यांचे कौतुकही केले," असेही मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com