tukaram mundhe police securtity | Sarkarnama

तुकाराम मुंढेंना पोलिस सुरक्षा : मुंढे म्हणतात, मी धमक्यांना घाबरत नाही

उमेश घोंगडे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना बुधवारी पुन्हा धमकीचे पत्र आल्याने खळबळ माजली होती. मुंढे यांना आलेले गेल्या महिन्यातील हे चौथे पत्र असून चारही पत्रातील अक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्राची दखल घेत पोलीसांनी मुंढे यांना तातडीने सुरक्षा पुरविली आहे.

मुंढे यांच्या बरोबर सदैव शस्त्रधारी पोलीस आधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिले पत्र आल्यानंतर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. मात्र आता चौथे पत्र आल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिल्या आहेत. 

या संदर्भात बोलताना पोलीस आरोपीचा शोध घेतील असा विश्‍वास मुंढे यांनी व्यक्त केला. पीएमपीएमएलचे काम करताना मी नियमानुसार निर्णय घेतले असून प्रत्येक निर्णयामध्ये पुणेकर प्रवासी हाच केंद्र बिंदू मानून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या काही निर्णयामुळे कुणाचे वैयक्तिक नुकसान झाले असेल तर मी त्यास काही करू शकत नाही. मात्र कुणाच्या धमकीने माझ्या कामाच्या पद्धतीत वा माझ्या निर्णयात काही बदल होतील, असे वाटत असेल तर त्यांनी माझा पूर्वेतिहास तपासावा, असे मुंढे यांनी सांगितले. 

या पुढील काळात "पीएमपीएमएल'च्या कामात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच राहतील. सहा महिन्याच्या काळात प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला असून त्याला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कामाकाजात सुधारणा करण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. रस्त्यावरील अपघात टाळणे आणि इंधन बचत या दोन महत्वाच्या घटकांवर चालकांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख