Tukaram Mundhe on Nigdi Pradhikaran | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे

उत्तम कुटे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित रिंगरोडच्या जागेवर झालेली अतिक्रमणे हटवून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंढे यांच्यासारख्या कार्यक्षम व तडफदार अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारने केली असल्याची चर्चा आहे. मुंढे यांची प्रति खैरनार (बुलडोझर अशी ओळख असलेले मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गो. रा. खैरनार) अशी ओळख आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यास यानिमित्ताने पुन्हा खो बसला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी 'पीएमपीएमएल'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रस्तावित रिंगरोडच्या जागेवर झालेली अतिक्रमणे हटवून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंढे यांच्यासारख्या कार्यक्षम व तडफदार अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारने केली असल्याची चर्चा आहे. मुंढे यांची प्रति खैरनार (बुलडोझर अशी ओळख असलेले मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गो. रा. खैरनार) अशी ओळख आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यास यानिमित्ताने पुन्हा खो बसला आहे.

मुंढे यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारने खास अधिसुचना जारी केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ती नगरविकास विभागाचे उपसचिव एस.एस. गोखले यांनी काल (ता.25) मुंढे यांच्या नव्या जबाबदारीचा हा अध्यादेश काढला. त्यात विशिष्ट कालावधी नमूद करण्यात आलेला नाही.पुढील सुचनेपर्यंत ही नियुक्ती राहील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

2004 नंतर पुणे विभागाच्या महसूल आयुक्तांकडेच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. त्यानुसार सध्याचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे फेब्रुवारी 2017 पासून अध्यक्ष होते. मात्र, त्यांच्याकडील पाच जिल्ह्यांचे जबाबदारीचे काम पाहता ते प्राधिकरणाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नव्हते. हीच गत प्राधिकरणाचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या पूर्वीच्या विभागीय आयुक्तांचीही होती. त्यामुळे प्राधिकरणाचा गाडा मुख्य कार्यकारी अधिकारीच हाकत होते. सध्या सतीशकुमार खडके यांच्याकडे ही जबाबदारी आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जोडीने प्राधिकरण हद्दीतही अनधिकृत बांधकामांचा मोठा प्रश्‍न भेडसावतो आहे. प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. प्रस्तावित आणि महत्त्वाकांक्षी अशा रिंगरोडच्या जागेवरही अतिक्रमण झाले आहेत.तेथे अंदाजे अडीच हजार झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्याजोडीने वाढीव बेकायदेशीर बांधकामांचाही प्रश्‍न प्राधिकरणाला सतावतो आहे. त्यामुळे हा ज्वलंत, गंभीर असा प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने खमक्‍या व बुलडोझर अशी प्रतिमा असलेल्या मुंढे यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपविली आहे.

 

संबंधित लेख