तुकाराम मुंढे कर्मचाऱ्यांना म्हणाले, "ताण असेल तर येऊन भेटा' 

तुकाराम मुंढे कर्मचाऱ्यांना म्हणाले, "ताण असेल तर येऊन भेटा' 

नाशिक ः महापालिकेतील कामकाजाच्या धडाक्‍याने कर्मचाऱ्यांवर ताण असल्याची तक्रार आहे. या संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करीत कर्मचारी संघटनांनी संपाची नोटीस दिली होती. मात्र मुंढे यांनी चर्चेला बोलावत कर्मचाऱ्यांना तीस लाखांचे गृहकर्ज, सत्तर हजारांचे वाहनकर्ज, वेतनश्रेणी अशा घोषणांचे "पॅकेज'च देऊ केले. त्यामुळे संघटनांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याने त्यांनी आयुक्तांपुढे पांढरे निशान फडकावले आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी कृती समितीने विविध मागण्यांसंदर्भात संपाचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने चर्चेचे निमंत्रण दिले होते. सोमवारी त्याविषयी बैठक झाली. विविध कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष असलेल्या शिवसेना नगरसेवक प्रवीण तिदमे, माजी महापौर अशोक दिवे, कॉंग्रेस नेते सुरेश मारु, अखिल भारतीय वाल्मीकी नवयुवक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल बहोत, प्रकाश अहिरे आदींनी आयुक्त मुंढे यांच्याशी चर्चा केली. 

त्यात महापालिकेत "फिक्‍स पे'वर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीवर घेण्याबरोबरच घर कर्जासाठी 30 लाख रुपये कर्जाची मर्यादा, तर 70 हजार रुपये वाहन कर्ज देण्याचा निर्णय सोमवारी (ता. 20) म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना, कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई न करता समज देण्याचे स्पष्टीकरण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. यावेळी प्रशासन उपायुक्त महेश बच्छाव, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, मुख्य लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे आदी उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसांत कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातून घरपट्टी विभागातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने असंतोष वाढला आहे. त्यापार्श्‍वभूमीवर कामाचा ताण असल्यास थेट भेटण्याचे आवाहन आयुक्त मुंढे यांनी बैठकीत केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. 

"आयुक्तांशी चर्चा झाली. त्यांनी सर्वांची मते जाणुन घेतली. त्यात चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत लिखीत स्वरुपात कार्यवाहीचे पत्र अपेक्षीत आहे. त्यानंतर कृती समितीच्या बैठकीत संपाविषयी पुढील निर्णय होईल.' 
प्रवीण तिदमे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com