तुकाराम मुंढे इन; फाईल हलवणारे एजंट गायब !

आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त म्हणुन कार्यभार स्विकारला. पहिल्याच दिवशी अधिका-यांचीच नव्हे तर कार्यालयाचीही झाडाझाडती घेतली. फाईल्स ट्रॅकींगसाठी खास सुचना दिल्याने फाईल हलविणारे दलाल, नगरसेवकांचे खासगी एजंट काही वेळातच गायब झाले. त्यामुळे अनेक नगरसेवक, पदाधिकारी घामेघुम झाले.
तुकाराम मुंढे इन; फाईल हलवणारे एजंट गायब !

नाशिक : आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे चर्चेत असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिका आयुक्त म्हणुन कार्यभार स्विकारला. पहिल्याच दिवशी अधिका-यांचीच नव्हे तर कार्यालयाचीही झाडाझाडती घेतली. फाईल्स ट्रॅकींगसाठी खास सुचना दिल्याने फाईल हलविणारे दलाल, नगरसेवकांचे खासगी एजंट काही वेळातच गायब झाले. त्यामुळे अनेक नगरसेवक, पदाधिकारी घामेघुम झाले.

सोलापूर, नवी मुंबई व पुण्यात आपला कामाची खास छाप पाडल्याने शासकीय प्रशासनात 'मुंढे पॅटर्न' आता सामान्यांमध्ये रुजला आहे. तर अधिकारी, राजकीय नेत्यांना त्याची चांगलीच धास्ती बसली आहे. त्याची प्रचिती पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेतही आली. तंतोतंत दहाला त्यांच्या 'एन्ट्री'पासून मुंडेसाहेबांचा हा रुबाब न्याराच ठरला. अधिका-यांना शीस्तीचे धडेही दिले. विविध कार्यालयांत फेरफटका सुरु करताच पोती भरुन भरुन साचलेल्या फाईल्स, कागदपत्र अऩ् कचरा निघाला. कर्मचा-यांनी लगबगीने सफाई सुरु केली. अगदी शहर अभियंत्यांच्या कार्यालयाचे ड्राॅवर देखील उघडुन पाहिले. 

यावेळी शहर अभियंत्यांनी थरथरत्या हाताने अर्धवट उघडलेला ड्राॅवर मुंढे यांनी 'ड्राॅवर पुर्ण उघडा ना" असे म्हणत तो पुर्ण उघडायला लावल्याने अनेकांच्या कपाळावर घामाचे थेंब डबडबल्याने कर्मचा-यांना कामाचा संदेश गेला. 

विशेषतः महापालिकेच्या फाईल्स संबंधीत कर्मचारी वगळता कोणीही हाताळु नये या सुचनांतुन योग्य संदेश गेला. त्यामुळे अनेक दलाल तसेच फाईल्स सरकावण्यासाठी नेगरसेवकांनी नेमलेले कार्यकर्ते महापालिका मुख्यालयातुन काह वेळातच गायब झाले.

मुंडेंचा पहिला दिवस... 
सकाळी बरोबर दहाच्या ठोक्याला तुकाराम मुंडे यांचे महापालिका मुख्य़ालय राजीव गांधी भवनमध्ये आगमन झाले. अकराला त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. दुपारी दीड ते चार पर्यंत अधिकारी, नगरसेवकांच्या शुभेच्छा स्विकारल्या. चारला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साडेचारला महापौरांशी चर्चा केली. सायंकाळी पाच ते सहा प्रशासकीय कार्यालयांना भेटी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com