Tukaram Mundhe Asks Details of Milk Consumed in NMC | Sarkarnama

तुकाराम मुंढेंनी तपशील मागताच, स्थायी समितीचे दूध दहा वरून एक लिटरवर? 

संपत देवगिरे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कामाला शिस्त लावण्याचा भाग म्हणुन विविध आयुक्त मुंढे यांनी विविध खात्यांच्या कामकाजाची नियमीत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यात अनेक विभागांच्या दैनंदिन खर्चाचा तपशीलही पुढे येऊ लागला. त्यात स्थायी समिती कार्यालयाच्या स्वागताची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याला रोज दहा ते अकरा लिटर दूध लागत असल्याचे आढळले. त्यावर खर्च सुरु राहू द्या... मात्र पाहुणचार केलेल्यांचा त्याचा तपशील नोंदवत चला, अशी सुचना आयुक्त मुंढे यांनी केली.

नाशिक : महापालिका पदाधिकाऱ्यांकडे कार्यकर्ते, नेत्यांची वर्दळ नवी नाही. येणाऱ्यांचे स्वागत, चहापान ओघाने येतेच. त्याचा खर्चही थोडा नसतो. मात्र, खर्च महापालिकेच्या खाती असल्याने पदाधिकाऱ्यांना त्याची तोशीस नसते. परंतू, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यावर कोणाला काय पाहुणचार दिला याचा तपशील नोंदविण्याच्या सुचना निघाल्या. त्यात स्थायी समितीला रोज दहा लिटर दूध लागत होते. ते आता एका लिटरवर आल्याचे कळते. 

कामाला शिस्त लावण्याचा भाग म्हणुन विविध आयुक्त मुंढे यांनी विविध खात्यांच्या कामकाजाची नियमीत माहिती घेण्यास सुरवात केली. त्यात अनेक विभागांच्या दैनंदिन खर्चाचा तपशीलही पुढे येऊ लागला. त्यात स्थायी समिती कार्यालयाच्या स्वागताची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याला रोज दहा ते अकरा लिटर दूध लागत असल्याचे आढळले. त्यावर खर्च सुरु राहू द्या... मात्र पाहुणचार केलेल्यांचा त्याचा तपशील नोंदवत चला, अशी सुचना आयुक्त मुंढे यांनी केली. त्याचा एव्हढा परिणाम झाला की, चहाला लागणाऱ्या दहा लिटर दूधाचा खप एकदम खाली आला. सध्या तर तो एक लिटर एव्हढा होऊ लागल्याचे पुढे आले आहे. 

अनेक राजकीय नेते, पदाधिकारी एका कार्यालयातुन दुसऱ्या कार्यालयात पाहुणचार घेत दिवसभर महापालिकेत वास्तव्याला असत. आता ते दिसेनासे झालेत. चहा घेतानांही नोंद घेतली जाणार हे कळल्यावर पदाधिकाऱ्यांनी आग्रह करणे थांबवले. भेटायला येणारेही 'चहा नको' असे सांगू लागलेत. 

संबंधित लेख