तुकाराम मुंढेच्या साफसफाईने नेत्यांचे हक्काचे कार्यकर्ते झाले बेघर 

गेल्या महिन्यात नाशिक रोड भागात 'वॉक वीथ कमिशनर' उपक्रमात काही नागरिकांनी त्यांच्या भागात असलेली व्यायामशाळा बंद असल्याची तक्रार केली होती. त्यावर आयुक्तांनी उपक्रम झाल्यावर तक्रार करणाऱ्या नागरीकासह जय भवानी रोड परिसरातील एका व्यायामशाळेला भेट दिली. यावेळी ती बंद अवस्थेत होते. त्यात जनावरे बांधलेली आढळली. दुसऱ्या वास्तूत एक कुटुंब रहात होते. नगरसेवकांनी आपल्याला निवासासाठी जागा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधितांकडून जागा रिकामी करण्यात आली होती.
तुकाराम मुंढेच्या साफसफाईने नेत्यांचे हक्काचे कार्यकर्ते झाले बेघर 

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका मालमत्तांची तपासणी आणि साफसफाईची मोहिम अधिक वेगवान केली आहे. यामध्ये महापालिकेच्या उद्याने, इमारतींत आपली खासगी मालमत्ता समजुन विविध नगरसेवक, नेत्यांनी लोकांना राहण्यास दिली होती. ही सर्व घरे रिकामी करण्यात आली आहेत. या कारवाईत चोवीस तास उपलब्ध असणारे हक्काचे कार्यकर्ते बेघर झाले. त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या नेत्यांनाही राजकीय कामकाजाच्या दृष्टीने पोरके वाटु लागले आहे. 

गेल्या महिन्यात नाशिक रोड भागात 'वॉक वीथ कमिशनर' उपक्रमात काही नागरिकांनी त्यांच्या भागात असलेली व्यायामशाळा बंद असल्याची तक्रार केली होती. त्यावर आयुक्तांनी उपक्रम झाल्यावर तक्रार करणाऱ्या नागरीकासह जय भवानी रोड परिसरातील एका व्यायामशाळेला भेट दिली. यावेळी ती बंद अवस्थेत होते. त्यात जनावरे बांधलेली आढळली. दुसऱ्या वास्तूत एक कुटुंब रहात होते. नगरसेवकांनी आपल्याला निवासासाठी जागा दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधितांकडून जागा रिकामी करण्यात आली होती. उद्यान विभागाला कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यांच्या कारवाईत शहरातील विविध तेरा उद्यानांत कुटुंबे रहात असल्याचे आढळले. त्यांच्याकडून ही घरे रिकामे करण्यात आली आहेत. 

यात सत्ताधारी आमदाराच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. रहायला जागा मिळाल्याने हे सर्व लोक चोवीस तास कामासाठी हक्काने उपलब्ध होत होते. आता हे हक्काचे कार्यकर्ते बेघर झाल्याने या नेत्यांनाही पोरके वाटू लागले आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राजकीय नेते, नगरसेवकांचा आयुक्तांविरोधातील हा राग आणि संताप कसा व्यक्त होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com