Tukaram Munde bypasses troublesome leaders | Sarkarnama

नाशिक महापालिकेत आव्हान देणा-या भाजप नेत्यांना तुकाराम मुंढेंकडून कात्रजचा घाट

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

नाशिक : सभापति पदावरुन निवृत्त होऊनही आयुक्तांना आव्हान देत शहराचे अंदाजपत्रक रोखण्याचे आव्हान दिले जात होते. यात राजकीय नेते महापालिकेला वेठीस धरण्याची शक्यता होती. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे महापालिका अधिनियमाचा आधार घेत अंदाजपत्रक थेट महासभेवर सादर करणार आहेत. हा डाव खेळुन मुंढेनी उधळलेल्या राजकीय नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला आहे. 

चिठ्ठी पध्दतीतून निवृत्त झालेल्या स्थायी समिती सदस्यांऐवजी अन्य नवीन सदस्यांची नियुक्ती महासभेत जाहिर करण्यात आली खरी परंतू नियुक्तीचा ठराव नगरसचिव विभागाला न पाठविल्याने आयुक्तांना प्रशासनाचे अंदाजपत्रक आज गणपुर्ती अभावी सादर करता आले नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्याचा भाग म्हणून स्थायी समिती ऐवजी थेट आता महासभेतचं अंदाजपत्रक सादर करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. 

महापालिकेचे सन 2018-19 या आर्थिक वर्षाचे अदांजपत्रक फेब्रुवारी महिना अखेर पर्यंत सादर करण्याच्या सुचना तत्कालिन सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले होते. प्रशासनाकडून अंदाजपत्रक मांडण्याच्या आतचं अभिषेक कृष्णा यांची बदली झाली. त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. अंदाजपत्रक मांडण्यास विलंब झाला.

याच दरम्यान स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपुष्टात येवून नवीन आठ सदस्यांची नियुक्ती महापौर रंजना भानसी यांनी जाहिर केली. महापालिका अधिनियम 1949, कलम 35 अ नुसार समिती गठीत नसेल तर महासभेवर अंदाजपत्रक सादर करता येते. त्या आधारे आयुक्तांनी आज नगरसचिवांना पत्र दिले. यातुन आव्हान देणा-या भाजप नेत्यांना मुंढे यांनी कात्रजचा घाट दाखवला आहे.

संबंधित लेख