tukaram munde | Sarkarnama

...आता तुकाराम मुंडे यांच्याकडे एड्‌स नियंत्रणाचे काम

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : नाशिकच्या महापालिका आयुक्तपदावर काम करताना वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मुंडे यांची एड्‌स नियंत्रण सोसायटीत प्रकल्प संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. ते सध्या नियोजन खात्यात सचिवपदी होते. नाशिकहून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता. 

मुंडे यांना मंत्रालयातील हे पद नको होते तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाही मुंडे यांच्यासारखा अधिकारी नको होता अशी मंत्रालयात चर्चा होती. मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधी नाराज होते. दूरचित्रवाणीवरील एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी आपल्या वारंवार होणाऱ्या बदलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 

संबंधित लेख