मी चांगला होतो असे निघून गेल्यावर पुणेकरांसारखे म्हणू नका : तुकाराम मुंढे 

पिंपरी-चिंचवडला असताना मी ज्येष्ठ नागरीकांच्या पासच्या दरात वाढ केली होती. मात्र, त्यानंतर विविध सुविधाही सुरु केल्या. परंतु, त्याला विरोध झाला. माझी बदली झाली. त्यानंतर करवाढ रद्द झाली. मात्र, आता 'तुकाराम मुंढे होते तेव्हा बरी सेवा होती', असे नागरिक म्हणतात. अशीच वेळ नाशिककरांवर येऊ नये असे वाटते - तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नाशिक : "नागरीकांनी करवाढीऐवजी मिळणाऱ्या सुविधा, सोयींविषयी जागरुक व अभ्यासू असावे. त्यातच खरे शहराचे हित असते. मात्र, लोक करवाढीवर टिका करतात. ही चुक उशीरा उमगते. त्यामुळे आता मी आयुक्त म्हणुन काम करतो आहे. त्याचा शहरासाठी उपयोग करुन घ्या. पुण्यात घडले तसे नाशिक सोडून गेल्यावर 'मुंढे चांगले होते' असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर न येवो...." महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नाशिकच्या नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

येथील प. सा. नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत आयुक्त मुंढे बोलत होते. ते म्हणाले, "पिंपरी-चिंचवडला असताना मी ज्येष्ठ नागरीकांच्या पासच्या दरात वाढ केली होती. मात्र, त्यानंतर विविध सुविधाही सुरु केल्या. परंतु, त्याला विरोध झाला. माझी बदली झाली. त्यानंतर करवाढ रद्द झाली. मात्र, आता 'तुकाराम मुंढे होते तेव्हा बरी सेवा होती', असे नागरिक म्हणतात. अशीच वेळ नाशिककरांवर येऊ नये असे वाटते. तेव्हा माझी बदली झाल्यावर तुम्हीही असे म्हणण्यापेक्षा येथे आहे, तर चांगल्या कामासाठी माझा उपयोग करून घ्या." 

...थोडा बचतीचा हिशेब मांडा 
यावेळी मुंढे यांनी महापालिका प्रशासनातील विविध विषयांची माहिती, धोरण व आगामी योजनांची माहिती दिली. एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, "अतिक्रमण निर्मूलन कारवाईत एक लॉन्स चुकीच्या पध्दतीने पाडण्यात आले. ते पुन्हा बांधण्यावर वीस लाख रुपये खर्च होईल. त्यासाठी प्रती व्यक्ती 1.20 रुपये आर्थिक बोजा पडेल असा हिशेब काहींनी मांडला. असा हिशेब प्रत्येक बाबतीत हवा. मी आलो तेव्हा अनेक निविदा चाळीस टक्के जादा दराने दिल्या जात होत्या. मी त्या प्रक्रियेत सुधारणा केली. आता मुळ किमतीतच कामे होतात. त्यातुन महापालिकेचे किती पैसे वाचले थोडा याचाही हिशेब मांडला तर बरे होईल. मी आहे त्या कालावधीत शहरासाठी, नागरीकांसाठी काम करीतच राहीन. त्यात बदल होणार नाही." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com