तृप्ती देसाई शबरीमलाचे दर्शन न घेताच रात्रीच्या विमानाने मुंबईत परतणार

तृप्ती देसाई शबरीमलाचे दर्शन न घेताच रात्रीच्या विमानाने मुंबईत परतणार

पुणे : केरळमधील कोचीजवळ शबरीमालाच्या दर्शनासाठी गेलेल्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना विमानतळावरच दिवस काढून रात्री पुन्हा मुंबईची वाट धरावी लागली आहे. संध्याकाळनंतर विरोधाची धार अधिकच वाढल्याने सव्वा नऊच्या विमानाने देसाई आणि त्यांच्या सहकारी परतणार असून रात्री अकराच्या सुमाराला मुंबईत पोचणार आहेत.

कोची विमानतळावर पोहोचल्यानंतर देसाई यांना विरोध करण्यासाठी स्थानिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. संतप्त जमावाला आवरता-आवरता पोलिसांना अक्षरशः नाकी नऊ आले होते. शिवाय संध्याकाळी परिस्थितीत हाताबाहेर जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देसाई यांना शबरीमालाच्या दर्शनाविनाचा परत फिरावे लागले. विमानतळाबाहेर असलेली परिस्थिती संध्याकाळी उशिरा हाताबाहेर जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी देसाई यांना दिली. त्यानंतर देसाई यांनी परतण्याचा निर्णय घेतला.

देसाई यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाल्या, ''स्थानिकांचा विरोध मोठा होता. त्यामुळे विमानतळाबाहेर येऊ नये, अशी विनंती पोलिसांकडून केली गेली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही परतण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वेळी आम्ही गनिमी कावा करुन दर्शनासाठी पोहचणार आहोत'`

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com