trupti desai agitation | Sarkarnama

दारूमुक्तीसाठी पालकमंत्र्यांच्या गाड्या अडविणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

संघर्ष यात्रा व संवाद यात्रा हे जनतेला फसविण्याचे काम आहे. केंद्र व राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे. शेतकऱ्यांना एकमुखी कर्जमाफी देण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपने संवाद यात्रा काढायची गरज नाही. संवादयात्रा काढायची, कोणती तरी समिती नेमायची, त्यादरम्यान निवडणूक आली की कर्जमाफी द्यायची, असे ढोंगी राजकारण सुरू असल्याचा आरोप देसाई यांनी केला. 

कऱ्हाड : दारुमुक्‍तीचे आंदोलन तीव्र करताना दारूधंदे उध्वस्त करण्याबरोबरच पालकमंत्र्यांच्या गाड्या अडविण्यात येतील, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला. 

देसाई म्हणाल्या," भाजपची सत्ता आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त केला. तसा सर्व पालकमंत्र्यांनी आपला जिल्हा दारूमुक्त करावा. सुप्रिम कोर्टाने 500 मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरणाचा डाव रचला जात आहे. रस्ते हस्तांतरण न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे झाले पाहिजे. महिलांचे संसार दारूमुळे उध्वस्त होत आहेत. निवडणुकीत दारू पाजून तरुणांचा वापर केला जातो. बिहार, गुजरात दारूमुक्त झाले आहे. बिहारचा आदर्श घेऊन मुख्यमंत्र्यांनी दारूमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घ्यावा. अवैध धंदे बंद करण्यासाठी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे. ते जर त्यांना जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी येत्या विस्तारात स्वतंत्र मंत्र्यांकडे गृहखाते द्यावे.' 

 

संबंधित लेख