tripura lenin statue | Sarkarnama

त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस, लेनीनचा पुतळा बुलडोझरने पाडला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

अगरतळा : त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर येताच डाव्यांच्या श्रद्धास्थान असलेला लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला असून या घटनेचा डाव्यांसह इतर पक्षांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. 

त्रिपुरात सत्तेवर येऊन दोन दिवसही होत नाहीत तोवर भाजप कार्यकर्त्यांनी धुडगुस घालण्यास सुरवात केली आहे. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा आहे.हा पुतळा बुलडोझरने पाडण्यात आला आहे. याबाबतची माहिती देताना 
त्रिपुराचे पोलीस अधीक्षक कमल चक्रवर्ती यांनी सांगितले, की काल दुपारी (सोमवारी) 3.30 वाजण्याच्या सुमारास भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या मदतीने लेनिनचा पुतळा तोडला. बुलडोझर चालकाला दारु पाजण्यात आली होती. पोलिसांनी बुलडोझर चालकाला अटक केली असून बुलडोझर ताब्यात घेण्यात आले आहे. 

भाजप आणि आयपीएफटीचे कार्यकर्ते त्रिपुरात हिंसा करत असल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने केला आहे. 

संबंधित लेख